Join WhatsApp group

मुर्तिजापूर : विवाहित महिलेला ऍसिड टाकून मारण्याची धमकी; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : १५ नोव्हें.२५ : मुर्तिजापूर शहरातील एका विवाहित महिलेला वारंवार फोन करून विनयभंग करण्यासोबतच ऍसिड टाकून जीव घेण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेत, 02 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास आरोपी योगेश शिवाजीराव कदम (वय 27, रा. मुळवा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ, ह.मु. कर्वेनगर पुणे) याने पीडितेच्या मोबाईलवर वारंवार कॉल करून जबरदस्ती वैयक्तिक संबंधांची मागणी केली तसेच तिचा विनयभंग केला.

आरोपीने “तु माझ्याशी बोलली नाहीस तर तुला ऍसिड  टाकून जिवे मारून टाकीन” अशी गंभीर धमकी देत, तिचे मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच पीडितेच्या पतीलाही फोनवर शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिली.

तक्रार 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री दाखल करण्यात आली असून, पोलीसांनी अप. क्र. 500/25, कलम 78, 351(2), 351(3), 352 BNS अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा दाखल अधिकारी HC 344 मंगेश घाटे, तर तपास अधिकारी ASI गजानन थाटे (ब.नं. 1466) असून पुढील तपास सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!