Join WhatsApp group

मूर्तिजापूर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटातून ‘नानक नेभनाणी – नॉट रिचेबल’ आणि शुभम मोहोड यांच्या नावाची जोरदार चर्चा…!!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : १५ नोव्हे. २५ : मूर्तिजापूरच्या राजकारणात नवी उलथापालथ…! शिवसेना शिंदे गटाकडून नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी नानक नेभनाणी (राजकीय नॉट रिचेबल) आणि युवा समाजसेवक शुभम मोहोड या नावांची चर्चा जोरात रंगू लागली आहे. संभाव्य उमेदवारांमुळे शहरातील राजकीय समीकरणांना अचानक वेग आला आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर या नावांवर विचार सुरु असून शिंदे गटाकडून कोणाला हिरवा कंदील मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शहरी राजकारण तापले; शिंदे सेना – उबाठा सेना समोरासमोर?

नानक नेभनाणी हे गेल्या काही दिवसांत “राजकीय नॉट रिचेबल” असल्याने त्यांच्या हालचालींबाबत पूर्ण गोपनीयता आहे. तर दुसरीकडे शुभम मोहोड यांच्या नावाला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे.

दोन्हींपैकी कुणाचेही नाव अंतिम जाहीर झाले तरी निवडणूक शिवसेना (उबाठा)विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सरळ संघर्ष निर्माण होऊ शकतो.


इतर सर्व पक्ष शांत – प्रतीक्षेतच…

आजतागायत

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
  • भाजपा
  • अजित पवार गट
  • राष्ट्रीय काँग्रेस पक्ष

यांनी आपल्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही.


उमेदवारी जाहीर झालेले पक्ष :

  • शिवसेना (उबाठा): विनायक गुल्हाने
  • वंचित बहुजन आघाडी: इम्रान शेख

शिंदे गटात नानक नेभनानी की शुभम? शहरभर चर्चा तापली…

या दोघांपैकी कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार यावर नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक चित्र पालटू शकते.

शहरातील चर्चेचा एकच केंद्रबिंदू—
“नानक नेभनाणी नॉट रिचेबल… आणि शुभम मोहोड आघाडीवर…? अंतिम नाव कोणाचे?”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!