Join WhatsApp group

सर्व सण शांतता व सद्भावनेने साजरे करावेत – पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचे आवाहन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : गणेशोत्सव विसर्जन व ईद-ए-मिलाद जुलूस हे दोन्ही सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यात आले. त्याच धर्तीवर आगामी नवरात्रोत्सव, दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे सणदेखील शांतता व सद्भावनेने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले.

अकोला कच्ची मेमन जमाततर्फे के.एम.टी. हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी या दोन्ही सणांच्या काळात पोलिस अधीक्षक चांडक यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा या प्रसंगी भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी आगामी काळात पोलिस विभाग आय-टेक्नॉलॉजीचा उपयोग करणार असून त्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच पोलिस विभागाला सकारात्मक सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला आमदार साजिद खान पठाण, समाजाचे ज्येष्ठ नेते जकी मियां नक्षबंदी, हाजी मुदाम खान, ज्येष्ठ पत्रकार शौकत मिरसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागपूरचे शब्बीर विद्रोही, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधर्शन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार पठाण यांनी दोन्ही समाजांच्या सणांच्या काळात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. दोनही सणांच्या वेळी कम्युनिटी पोलिसिंगची उत्तम उदाहरणे अर्चित चांडक यांनी घालून दिली, असे पत्रकार मिरसाहेब यांनी सांगितले.आयोजक जावेद जकेरिया यांनी सर्वांचे आभार मानले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!