Join WhatsApp group

मुर्तिजापूरात अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर :दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता मातोश्री पेट्रोलपंप समोरील रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली.

प्रमोद रामभाऊ खेडकर (वय 44, रा. शंकरनगर, मुर्तिजापूर) हे आपल्या मोटारसायकल क्रमांक MH-30 W-7991 ने शेतातून घरी जात असताना हीरपूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत खेडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडले. मात्र, अपघातानंतर वाहनचालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.

खेडकर यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांनी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 415/2025, कलम 281, 125 (अ) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास नाईट ऑफीसर एचसी 1336 इरफानौद्दीन यांच्या आदेशाने दाखल अधिकारी एचसी 114 विनोद कुंभरे यांनी सुरू केला असून पुढील तपास इरफानौद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

👉 अपघातस्थळावरून पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरू असून, नागरिकांना उपयुक्त माहिती असल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!