Join WhatsApp group

गायत्री बालिकाश्रम येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (14 सप्टेंबर) :अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, अकोला जिल्ह्याच्या वतीने स्थापना दिनानिमित्त गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृह, बसेरा कॉलनी मलकापूर येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. श्रीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशुंपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलींची तपासणी करण्यात आली. शिबिरात 100 हून अधिक बालकांनी सहभाग घेतला. मुलांना जीवनसत्त्वांच्या गोळ्या, दूध पावडर व दैनंदिन उपयोगी औषधांचे वाटप करण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वीतेकरिता देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. श्रीश देशमुख, डॉ. वसीम, आशिष वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, अंकुश गंगाखेडकर, गणेश भडांगे यांनीही सहकार्य केले.

औषधे पुरविण्यासाठी दत्त मेडिकल चे संचालक भूपेश मुंदडा, रुग्णसेवा मेडिकल चे पंजाब रोडे, एम. आर. असोसिएशन चे प्रशांत माळी यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाला अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष व मुख्य सरकारी वकील ॲड.. राजेश्वर देशपांडे, प्रांत उपाध्यक्ष ॲड. सत्यनारायण जोशी, प्रांत महामंत्री ॲड भूषण काळे, जिल्हा महामंत्री ॲड.विजय भांबरे यांच्यासह अनेक अधिवक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गायत्री बालिकाश्रमचे गणेश काळकर, विजय जानी, मीरा जोशी, सुधाकर गीते, विजेता रायपुरे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, संरक्षण अधिकारी सुनील लाडूलकर यांचेही सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. देवाशिष काकड यांनी केले तर आभार प्रदर्शनॲड. विजय भांबरे यांनी केले.

👉 अधिवक्ता परिषदेतर्फे समाजहिताचे व लोकाभिमुख असे विविध उपक्रम सातत्याने राबवले जात असून, कायदा विषयक जनजागृती तसेच वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी परिसंवाद आणि शिबिरे आयोजित केली जातात.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!