Join WhatsApp group

५००० कि.मी.चा थरारक पाठलाग – डाबकी रोड पोक्सो प्रकरणातील नराधम इंदौर येथे अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधमाला अखेर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५००० कि.मी.चा थरारक पाठलाग करून इंदौर (मध्यप्रदेश) येथे जेरबंद केले.

📌 दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात अप.क्र. २९९/२०२५ कलम ६५(१), ७१(१), ३३३, ३५१(२)(३), ३५२ बीएनएस सहकलम ४(२), ६(१), ८, १२ पोक्सो अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गणेश विसर्जनासाठी घरातील सदस्य बाहेर गेले असता, आरोपी तौहीदवान सगीरखान बैद (वय २८, रा. अकोला) याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ आरोपीला पकडण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले.

🔎 आरोपीचा शोध घेताना पथकाने भुसावळ, सुरत, अहमदाबाद, दिल्ली, आग्रा, एटा, भोपाल, गुना, ललितपूर, शिवपुरी, उज्जैन, देवास अशा अनेक शहरांमध्ये रेल्वे स्टेशन, बस स्थानके, लॉजेस, मंदिरे येथे शोधमोहीम राबवली. आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने अटक करणे अवघड झाले होते.

📹 या मोहिमेत पथकाने तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेज तपासली, १२ रेल्वे गाड्या व अनेक बसेस तपासून पाहिल्या. तसेच विमान, चारचाकी, ऑटो, रेल्वे व बस अशा सर्व साधनांनी ५००० कि.मी.चा प्रवास करून आरोपीच्या मागावर पथक होते.शेवटी मिळालेल्या तांत्रिक माहितीद्वारे आरोपी इंदौर बायपास परिसरात असल्याचे समजले.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, शेख हसन, एजाज अहमद, मोहम्मद आमीर यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून आरोपीला अटक केली.

🚔 आरोपीवर यापूर्वीही अकोला शहरातील कोतवाली, डाबकी रोड, रामदासपेठ ठाण्यात बलात्कार, चोरी, मारहाण, धमकी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके व ४० पोलीस कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांतून करण्यात आली.

👉 समाजात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या या नराधमाला अखेर गजाआड करण्यात अकोला पोलिसांना यश मिळाले असून जिल्ह्यात दिलासा व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!