Join WhatsApp group

काटेपुर्णा तलावात अनोळखी महिलेचा मृतदेहओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

बोरगाव मंजू –काटेपुर्णा तलावात एका ७० वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ११ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आढळून आला आहे. या संदर्भात बोरगाव मंजू पोलिसांनी नागरिकांना ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, तिर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराजवळील तलावात गुराख्यांच्या नजरेस सदर मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे योगेश विजयकर, विजय माल्टे, शाहबाज शहा, शेख नजीर, दिनेश श्रीनाथ, मोहन वाघमारे, ईश्वर हरणे, अक्षय मोरे, सैय्यद माजिद, शेख मोईन तसेच संत गजानन महाराज बहुद्देशीय संस्था, मुर्तिजापूर यांच्या स्वयंसेवकांनी मदत केली. या मोहिमेत आमदार हरीश पिंपळे यांच्या सूचनेवरून निलेश उर्फ बादशाह, नारू अन्ना, बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे अधिकारी उमेश पुरी, अजिंक्य हळदे आदींनी सहभाग घेतला.

घटनास्थळी मृतदेहा जवळून ओळख पटेल असे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

सदर मृत महिला कुणाच्या नातेवाईकांची किंवा ओळखीची असेल तर त्वरित बोरगाव मंजू पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!