Join WhatsApp group

कर्जाच्या वादातून भावावर कुऱ्हाडीने हल्ला

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथे ९ सप्टेंबर २५ रोजी मंगळवारी दुपारी कर्जाच्या वादातून भावानेच भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली.

या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सुनिल जनार्दन खाडे (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. ग्रामसेवक कॉलनी, मूर्तिजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मानलेला भाऊ गजानन देवीदास गुरदे (रा. बॅक कॉलनी, मूर्तिजापूर) हा दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास त्यांच्या घरी आला.

त्याने एका वर्षापूर्वी शेत घेण्यासाठी दिलेले तब्बल ४ लाख २५ हजार रुपये परत मागितले. यावर खाडे यांनी “मी तुझे पैसे परत केले आहेत” असे सांगितल्यावर वाद वाढला.

वाद वाढताच आरोपी गजानन गुरदे याने खाडे यांना शिवीगाळ करून घराबाहेर ओढत आणले व कुऱ्हाडीने त्यांच्या डाव्या दंडावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी खाडे यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध अप. क्र. 410/2025 भादंविचे कलम 118 (1), 352 बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास PSI अरुण मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

👉 आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले असून, पुढील तपास सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!