Join WhatsApp group

पर्यावरण पूरक गणेश विसर्जन : पावन कुंडात ६०४ घरगुती गणरायांचे विसर्जनस्वच्छता अभियानाच्या : उपक्रमाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर – दिनांक ०७ सप्टेंबर २५ :मुर्तीजापूर स्वच्छता अभियान व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या नऊ वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाचा अनोखा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याच उपक्रमांतर्गत दि. ६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पावन कुंडाची निर्मिती करून ६०४ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन मंगलमय वातावरणात करण्यात आले.

पवित्र गंगा, नर्मदा, गोदावरी, पूर्णा व काटेपूर्णा नद्यांचे जल आणून पंडित धनंजय मिश्रा यांच्या हस्ते पावन कुंडाचे पूजन करण्यात आले. या वेळी आमदार हरीष पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, ठाणेदार अजित जाधव, ग्रामीण ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सतीश अग्रवाल यांच्यासह स्वच्छता अभियानात सक्रिय असलेल्या स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी अपार यांनी स्वतःच्या घरगुती गणरायांचे विसर्जन पर्यावरण पूरक कुंडात करून शहरवासीयांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.

आमदार हरीष पिंपळे यांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि भाविकांच्या श्रद्धेला धक्का न लावता मूर्ती विसर्जन करण्यासाठी पर्यावरण पूरक कुंड ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “गणरायाला निरोप देताना मूर्तीची विटंबना होऊ नये, तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, याकरिता शहरात विविध ठिकाणी विसर्जन कुंड निर्माण व्हावेत,” असे मत उपविभागीय अधिकारी अपार यांनी व्यक्त केले.

oplus_8388608

गणेश विसर्जनावेळी भाविकांनी आपल्या कुटुंबासह वाजतगाजत सहभाग घेतला. अनेक बालकांना बाप्पाला निरोप देताना अश्रू अनावर झाले. या उपक्रमात निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांना व उपस्थितांना आभारपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी साठी शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले. स्वच्छता अभियानाचे जेष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी,ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले,रोहित सोळंके,दिनेश श्रीवास,चंदन अग्रवाल,संतोष माने,जितेंद्र चौबे, गजानन वरघट,विनोद देवके,रवी गोंडकर, दीपक खंडारे, विशाल वानखडे,सुरेंद्र भेलोंडे,रवी चव्हाण, श्याम काकडे,सुनील भोजगडिया, नितीन परांजपे, सुनील वानखडे,ज्ञानेश टाले,अली सर,इम्रानभाई, विलास वानखडे,रवी खांडेकर, दिगंबर सदार,माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर भड,सार्थ पंकज ठाकूर, नागोराव तायडे, कैलास मस्के तसेच नगरपरिषद अग्निशमन दलाचे रवींद्र जवंजाळ, मोहम्मद सलिम,अब्दुल आसिफ, तिलक टाक, विजय लकडे,अभियंता अमोल दातीर, नरसिंग चावरे, चालक राकेश बोयत यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विलास नसले यांनी केले.आभार रवी गोंडकर यांनी व्यक्त केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!