Join WhatsApp group

अधिवक्ता परिषद, विदर्भ प्रांताचा अभ्यास वर्ग पुसद येथे उत्साहात पार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

पुसद | दिनांक 26 जुलै 2025 रोजी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, विदर्भ प्रांताच्या वतीने विदर्भातील अधिवक्त्यांसाठी एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले.

या अभ्यास वर्गाला अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील मुख्य सरकारी वकील ॲड. राजेश्वर देशपांडे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यातील अनेक वकील बांधव-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या वेळी प्रमुख मुद्दे :

ॲड. भूषण काळे यांनी परिषदेमधील लिटिगेशन, ऑर्गनायझेशन आणि आऊटरीच या तीन संघटनात्मक आयामांवर सविस्तर माहिती दिली.

ॲड. सत्यनारायण जोशी यांनी न्यायालयीन कामकाजात वकिलांना भेडसावणाऱ्या समस्या आणि परिषदेकडून त्यावर होणाऱ्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

श्री. शैलेश पोतदार यांनी परिषदेला एक सामाजिक प्रश्न सोडवणारे, वैचारिक परिवर्तन घडवणारे अग्रणी संघटन असे संबोधले.

ॲड. पारिजात पांडे यांनी परिषद ही एक वैचारिक अधिष्ठान असलेली शिस्तबद्ध संघटना असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यशाळेत अकोला जिल्ह्यातून सहभागी झालेल्या प्रमुख अधिवक्त्यांमध्ये ॲड. आनंद गोदे, ॲड. किरण खोत, ॲड. आशिष फुंडकर, ॲड. विलास जवंजाळ, ॲड. अरुण कुकडे, ॲड. दीपक कुटे, ॲड. परेश सोलंकी, ॲड. रोहित पिंगळे, ॲड. गिरीश नाकट, ॲड. देवाशिष काकड, ॲड. विकास धोत्रे, ॲड. केशव इंगोले, ॲड. सागर जोशी, ॲड. श्रीकांत काळे, ॲड. प्रवीण महाळंकर, ॲड. प्रविण राठी, ॲड. विभव दीक्षित, ॲड. भारती रुंगटा, ॲड. मुक्ता ठकार, ॲड. रुपाली काकडे, ॲड. राधिका देशपांडे, ॲड. सारिका गिरणीकर यांचा समावेश होता.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा मंत्री ॲड. विजय भांबेरे यांनी विशेष मेहनत घेतली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!