Join WhatsApp group

पन्नास रुपयांच्या भाड्यासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!शहरात स्टीलने भरलेले ऑटो धावतात बेधडक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दि. २६ जुलै २५ : शहर आणि ग्रामीण भागात दररोज केवळ पन्नास रुपयांच्या भाड्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन धावणाऱ्या काही ऑटो रिक्षांमध्ये बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टीलचे सळई bundles ठासून भरलेले असतात.

अशा ऑटोंमधून विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ धोकादायकच नाही, तर कधीही जीव घेणारी घटना घडू शकते.यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन अक्षरशः ‘स्वस्त’ झाले असून, या गोंधळात जर एखादी अप्रिय घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशा मागण्या सध्या जोर धरत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!