Join WhatsApp group

दर्यापूरचा परश्या बनला मुर्तीजापुर मध्ये सैराट

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. २६ जुलै) – मूर्तिजापूर शहरात सध्या ‘परश्या’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या शासकीय दलाली संदर्भात खळबळ उडाली आहे.

बाहेरगावी येथून मूर्तिजापूरात येऊन विशिष्ट पोशाखात वावरणारा परश्या अनेक शासकीय कार्यालयात दलाली करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

परश्याने चपराशीपासून ते काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत दलालीचे जाळे विणले असून त्यामध्ये अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक झाली आहे.

त्याने दलालीच्या माध्यमातून एका मोठ्या राजकीय कार्यकर्त्यालाही गंडवल्याचे प्रकार सुद्धा घडले आहे.

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या त्या राजकीय नेत्याने थेट राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एका मातब्बर राजकीय नेत्या सोबत परश्या व संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चर्चा जवळपास तासभर झाली.

विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही याची गंभीर दखल घेतील असून लवकरच परश्या व संबंधित अधिकाऱ्यांची शाळा भरवली जाणार आहे.

सदर नेत्याचा मुंबईत मोठा राजकीय प्रभाव असल्याने आता या प्रकरणाची राजकीय व प्रशासकीय स्तरावर मोठी भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील सर्व प्रकरणांचे दस्तावेज गोळा करण्याचे काम त्या राजकीय नेत्यांनी सुरू केले आहे. तसेच परश्याची आणि त्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!