Join WhatsApp group

मुर्तीजापुर तालुक्यातील निंबा गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण; पुन्हा सुरु झाली शेती, वृक्षतोड करून शासनाचा निधी वाया

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : (दि. २६ जुलै २५) : निंबा गावातील गायरान जमिनीवर काही स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून पुन्हा अतिक्रमण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अंदाजे 100 एकर गायरान पैकी सुमारे 30 ते 40 एकर क्षेत्रावर अतिक्रमण करून त्यावर बिनधास्तपणे शेती सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ग्रामपंचायत सरपंच व काही पदाधिकाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून, त्यांची भूमिका देखील संशयास्पद ठरत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याआधी दोन वर्षांपूर्वीही या अतिक्रमणाचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावेळी खुद्द जिल्हाधिकारी अरोडा मॅडम यांनी गायरान जागेची पाहणी करून सुमारे १८०० झाडांची लागवड केली होती. यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन खर्च करण्यात आला होता.

तथापि, काही महिन्यांतच अतिक्रमणकर्त्यांनी परत जागेवर कब्जा करत ती झाडे उखडून टाकली आणि पुन्हा शेती सुरू केली. ही सर्रासपणे सुरू असलेली कारवाई म्हणजेच शासनाच्या निधीचा आणि पर्यावरणाचा सरळ अपमान आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत सदस्य, काही सामाजिक कार्यकर्ते व गुरेपालन करणारे ग्रामस्थ यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून अतिक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!