Join WhatsApp group

कावड यात्रेनिमित्त तयारीचा आढावा: एसपी अर्चित चांडक व आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : येत्या कावड यात्रेनिमित्त संपूर्ण तालुक्यात आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शासकीय विश्रामगृह मूर्तिजापूर येथे दिनांक 26 जुलै 25 रोजी बैठक पार पडली.

या बैठकीत पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी अपार साहेब, तहसीलदार शिल्पा बोबडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, एमएसईबीचे अधिकारी, अभियंते, तसेच शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांचे ठाणेदार अजित जाधव व श्रीधर गुट्टे आदी अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत खालील मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली:

कावड यात्रेचा मार्ग निश्चित करणे व मॅपिंग करणे.

कावड प्रवासा दरम्यान लाईट व स्वच्छतेची व्यवस्था सुनिश्चित करणे

रस्ते अतिक्रमण हटवणे व मोकळे करणे

अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवणे

कावडधारकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, विश्रांती व आरोग्य सुविधा उपलब्ध करणे.

समाजकंटकांना आळा घालने.

पोलीस अधीक्षक चांडक यांनी यासाठी संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या.

नगरपरिषद प्रशासनाला रस्ते स्वच्छता, अतिक्रमण हटवणे व अन्य सुविधा योग्यरित्या उभारण्याचे निर्देश देण्यात आले.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते लक्षेश्वर संस्थामध्ये अभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजूभाऊ दहापुते, स्थानिक सरपंच व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची ही सक्रियता निश्चितच स्वागतार्ह असून, यात्रेचा मार्ग अधिक सुकर व भक्तांसाठी सोयीस्कर होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!