Join WhatsApp group

महिला न्यायाधीशाचा विनयभंग प्रकरण: आरोपी वकील पीसीआरमध्ये २२ जुलै पर्यंत – रामदासपेठ पोलिसांची कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला: (दि.१८ जुलै २५) जिल्हा सत्र न्यायालयातील एका महिला न्यायाधीशाचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या वकिलाला न्यायालयाने २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत (पीसीआर) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रामदासपेठ पोलिसांनी या गंभीर प्रकरणात वेगवान कारवाई करत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव तेलगोटे असे या आरोपी वकिलाचे नाव असून, तो महिला न्यायाधीशांचा पाठलाग करत होता. इतकेच नव्हे तर, सोशल मीडियावर अश्लील व त्रासदायक संदेश पाठवून त्यांना मानसिक त्रास देत होता. बुधवारी पीडित महिला न्यायाधीश कार्यालयात असताना, आरोपीने विनापरवानगी कार्यालयात प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी झटापट केली.

या प्रकारानंतर पीडित महिला न्यायाधीशांनी विनयभंग, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि सोशल मीडियावर अश्लील वर्तन यासारख्या गंभीर आरोपांसह तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे रामदासपेठ पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 74, 75, 76, 78 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) अंतर्गत गुन्हा नोंदवला. तक्रार दाखल होताच काही तासांत पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला २२ जुलैपर्यंत पीसीआरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास रामदासपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरीष खंदारे करीत आहेत.

हा प्रकार केवळ न्याय व्यवस्था नव्हे तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. जेव्हा न्याय देणारी व्यक्तीच पीडित ठरते, तेव्हा संपूर्ण समाजाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!