Join WhatsApp group

अतिक्रमण कारवाईत अभियंता संकेत यांचे दुहेरी धोरण? नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. १७ जुलै):शहरात सुरु असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज स्टेशन विभागात नगरपरिषदेच्या पथकाने अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली.

अतिक्रमण धारकांना एक दिवसाची मुदत देऊनही त्यांनी अतिक्रमण न हटवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई नागरिकांच्या दृष्टीने योग्य ठरली असली, तरी या कारवाईत दुहेरी निकष लावल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अभियंता संकेत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काही दुकानांचे शेड जेसीबीने जमीनदोस्त केले. मात्र, याच भागातील काही माजी नगरसेवकांचे नातेवाईक आणि ओळखीतील दुकानदारांचे शेड मात्र वाचवले गेल्याचे निदर्शनास आले.

परिणामी, कारवाईत पक्षपात केला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

विशेषतः पोळा चौकामध्ये काही दुकानदारांकडून दोन हजार रुपयांची पावती घेत त्यांचे शेड कायम ठेवण्यात आले, तर इतर दुकानदारांचे शेड न तोडता त्यांना दंड करून सोडण्यात आले. पत्रकारांनी जेव्हा या संदर्भात अभियंता संकेत यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी दुकानदारांनी रस्त्यावरील चेकर्स खराब केल्यामुळे दंड आकारल्याचे कारण सांगितले.

तथापि संपूर्ण कारवाईत एकसंधता न दिसता, गल्लीप्रमाणे धोरणे बदलल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अभियंता संकेत यांची भूमिका संशयास्पद आणि पक्षपाती असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!