Join WhatsApp group

अमली पदार्थ एमडी विक्री प्रकरणी दोघांना अटक – खदाण पोलिसांची कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – गौरक्षण रोडवरील मातृभूमी प्रेसजवळ दोन तरुण एमडी अमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती खदान पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली.

त्यांच्या जवळून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ४६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत करण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.

गौरक्षण मार्गावरील वीज कंपनीच्या पॉवर हाऊसजवळ दोन तरुण एमडी विक्री करत असल्याची माहिती खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ गुन्हे अन्वेषण विभागाच्या (डीबी) पथकाला कारवाईचे आदेश दिले.पोलिसांनी सापळा रचून तेल्हारा तालुका मधील पंचगव्हाण येथील रहिवासी मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ (२३) व गफुरवाला प्लॉट येथील मुस्ताक खान आसिफ खान (४७) यांना अटक केली.

झडतीत त्यांच्याकडून एमडीसह पुढील गोष्टी जप्त करण्यात आल्या:

२.३० लाख रुपये किमतीचा एमडी (४६ ग्रॅम)

२० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन

१ लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी

३.५ लाख रुपयांची रोख रक्कम

या प्रकरणी गब्बर जमादार या फरार आरोपी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगेंद्र मोरे, एएसआय दिनकर धुरंधर, नितीन मगर, रवी काटकर, विजय मुलाणकर, अजय वानखडे, रोहित पवार, विक्रांत अंभोरे यांच्या पथकाने केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!