Join WhatsApp group

गोवंश हाडांची तस्करी उघड! – मूर्तिजापूरात शहर पोलिसांनी बोलेरो वाहन पकडले, आरोपीला अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. १६ जुलै) – शहरातील भगतसिंग चौक परिसरात गोवंश जनावरांची हाडे वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनाला पोलिसांनी सापळा रचून अटकाव करत मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दि. १५ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली असून, यामध्ये तब्बल २८०० किलो गोवंश हाडे आणि बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH 27 BX 1288) जप्त करण्यात आले आहे.

आरोपीचे नाव : अब्दुल हकीम अब्दुल अजीज (वय २७, रा. खोलापूर, ता. भातकुली, जि. अमरावती)एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: सुमारे ₹५.२८ लाख

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे जाळे उभे करण्यात आले होते. नाकाबंदी दरम्यान बोलेरो पिकअप गाडी थांबवून झडती घेतली असता त्यात कत्तल केलेल्या गोवंश जनावरांची हाडे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुढीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लागू करण्यात आलेले कलम:🔸 कलम 325 भादंवि🔸 महा. प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारणा अधिनियम 2015) अंतर्गत कलम 5, 5(ब), 5(क), 9(अ)

गुन्हा क्रमांक: अप. 348/25 दाखल अधिकारी: हेड कॉन्स्टेबल गजानन चांभारे (ब.न. 1655)तपास अधिकारी: हेड कॉन्स्टेबल सतिश कथे (ब.न. 1560)

सदर कारवाई मध्ये ठाणेदार अजित जाधव पीएसआय गणेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

पोलिसांनी सदर वाहन व हाडे ताब्यात घेत तपास सुरू केला असून आरोपीच्या मागील इतिहासाचीही चौकशी केली जात आहे. मूर्तिजापूर पोलिस स्टेशनच्या पथकाच्या या वेळी घेतलेल्या तत्पर कारवाईमुळे गोवंश तस्करीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

पोलिसांचा जनतेस आवाहन :

शहरात व परिसरात गोवंश तस्करी, कत्तल किंवा संशयास्पद वाहतूक दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!