Join WhatsApp group

मूर्तिजापूर शहरात अतिक्रमणावरून संतप्त चर्चा – नगरपरिषदेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (ता. १६ जुलै) – (प्रेमराज शर्मा)

शहरात आज सकाळपासून नगरपरिषदेने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यवसायिक अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिक व लघु व्यापाऱ्यांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. अनेकांनी ही कारवाई ‘अन्यायकारक’ व ‘एकांगी’ असल्याचा आरोप करत आहे.

oplus_8388608

शहरातील अतिक्रमण ही दीर्घकालीन समस्या आहे, हे जरी खरे असले तरी, नगरपरिषद वर्षातून एकदाच निवडक पद्धतीने कारवाई करते, अशी नागरिकांची तीव्र भावना आहे. यावेळी छोट्या व्यवसायिकांवर कारवाई झाली, परंतु शहरातील मोठ्या राजकीय पाठबळ असलेल्या अतिक्रमणांकडे डोळेझाक झाल्याचा आरोप होत आहे.

💸 नगर परिषदेकडून पीएम स्वयंनिधी, पण नंतरच धंदा उद्ध्वस्त?

नागरिकांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारच्या योजना वापरून अनेकांनी नगरपरिषदे कडून लघु उद्योगासाठी कर्ज घेतले आहे. परंतु जर व्यवसायच बंद केला जात असेल, तर त्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे? यावर कोणीच उत्तर देत नाही.

🤔 अर्धवट नियोजन व निवडक कारवाई? २० लाख ५० हजार रुपयांचे टेंडर एका ठेकेदाराला

नगरपरिषदेला महसूल मीळावा यासाठी मागील वर्षी २० लाख ५० हजार रुपयांचे टेंडर एका ठेकेदाराला दिले असून, तो ठेकेदार दररोज अतिक्रमणधारकांन कडून व आठवडी बाजार मधून २० रुपये शुल्क वसूल करत असून मुर्तीजापुर नगर परिषदेला हे पैसे भरत आहे व स्वतःचा परिवार चालवत आहे. अतिक्रमण हटविल्यावर त्याचे उत्पन्न बंद होईल व तो स्वतः आर्थिक अडचणीत येईल असे का ठेकेदाराचे म्हणणे आहे.

🏢 नगरपरिषद कॉम्प्लेक्समध्येही अतिक्रमण, पण कारवाई नाही!

नगरपरिषदेने बनवलेल्या व्यापारी संकुलांमध्येही दुकानदारांनी दुकानांच्या सीमांबाहेर शेड टाकून अतिक्रमण केले आहे. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट काही दुकानदारांची ३० वर्षांची लीज संपली असूनही ते तेथे व्यवसाय सुरू ठेवून आहेत. याकडे नगरपरिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

बियाणी जीन प्रकरण न्यायप्रविष्ट – मोठ्या जागेचा वापर होणार कधी?

शहराच्या मध्यभागी असलेली ‘बियाणी जीन’ची जागा सध्या न्यायप्रविष्ट आहे. तीच सर्वात मोठी जागा असूनही नगरपरिषदेने अद्याप त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था किंवा योजनाबद्ध निर्णय घेतलेले नाहीत, यावरूनही प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतिक्रमण हटवणे गरजेचे असले तरी, त्यासाठी भेदभाव न करता पारदर्शक, नियोजनबद्ध आणि सर्वांगीण उपाययोजना आवश्यक आहे. नागरिकांचा एक सूर आहे – “अतिक्रमण म्हणजे अतिक्रमणच, मग तो कुणाचाही असो!”लघु व्यापाऱ्यांना पर्यायी जागा, अधिकृत परवाने व आर्थिक स्थैर्य देऊनच अशा मोहिमा राबविणे आवश्यक आहे, अशी मागणी सध्या मूर्तिजापुर शहरात जोर धरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!