Join WhatsApp group

मूर्तिजापूर शासकीय रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्यासाठी “ब्लड अँड हेल्पर ग्रुप”चा पुढाकार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (ता. १६ जुलै) –

मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात रक्तपेढी (ब्लड बँक) सुरू व्हावी, यासाठी “ब्लड अँड हेल्पर ग्रुप”च्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली असून लवकरच अधिकृत निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णसेवक रवि माडकर यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील तसेच अमरावती जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयांत रक्ताच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मूर्तिजापूरमध्ये शासकीय रक्तपेढी सुरू झाल्यास गरजूंना वेळेत आणि मोफत/कमी दरात रक्त मिळू शकते. सध्या खाजगी डॉक्टरांकडून रक्तासाठी ११०० ते १७०० रुपयांपर्यंत खर्च येतो, तो खर्चही वाचू शकतो.

“ब्लड अँड हेल्पर ग्रुप” ही संस्था मागील पाच वर्षांपासून रक्तदान शिबिरे आयोजित करून हजारो रक्तपिशव्या संकलित करत आहे आणि अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

ही प्रेरणा घेऊन, मूर्तिजापूरच्या शासकीय रुग्णालयात काही वर्षांपूर्वी रक्तपेढीस मान्यता मिळाली होती. मात्र, काही कारणांमुळे त्याचे काम रखडले.या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत, रुग्णसेवक रवि माडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनास भेट देऊन पुन्हा रक्तपेढी सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन देणार आहेत.

या उपक्रमात सहभागी असलेले प्रमुख कार्यकर्ते

द्वारका भैय्या दुबे, बबलू भाऊ भेलोंडे, विष्णू भाऊ लोडम, सुनिलभाऊ शितोळे, विलासभाऊ वानखडे, स्वप्नील जामनिक, मो. इम्रान, शाहिद चाऊस, स्वप्नील वरखडे, संतोष भाऊ भांडे पाटील, रुग्णसेवक सेनापती, वैभव वानखडे, धीरज मोकासे, गजानन चव्हाण, उज्ज्वल शेवतकर, जाहीर अहमद, शैय्यद अकील, मोहब्बत शब्बीर, अर्शद अली.

महात्मा फुले ब्लड डोनर ग्रुपचे – आकाश डहाके, विनीत गडवे, वैभव बावने, रोहित जोगी, प्रथमेश धनोकार तसेच अमोल राऊत, आदित्य बोर्डे, राज अंभोरे, करण कनोजे, गौरव उटाळे, आकाश सायगान, राहुल गुल्हाने, अविनाश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हा सामाजिक पुढाकार मूर्तिजापूर सारख्या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लवकरात लवकर शासकीय रक्तपेढी सुरू व्हावी, अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!