Join WhatsApp group

खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश : अकोल्यात दोन गाड्यांना थांबा मंजूर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : अकोला शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली काही महत्त्वाच्या गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. अकोल्याचे प्रभारी खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार, आता खालील गाड्यांना अकोल्यात थांबा मिळणार आहे.

दुरांतो एक्सप्रेस (१२२६१) – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते हावडा

दुरांतो एक्सप्रेस (१२२६२) – हावडा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स

ट्रेन क्रमांक २०१५१ – पुणे ते रेवा

ट्रेन क्रमांक २०१५२ – रेवा ते पुणे

अकोला हे रेल्वे जंक्शन असूनही, काही महत्त्वाच्या गाड्यांना इथे थांबा नव्हता. त्यामुळे प्रवाशांना अन्य ठिकाणी चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी अडचणी येत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. परंतु आता या नव्या निर्णयामुळे अकोल्यातील प्रवाशांना थेट सुविधा उपलब्ध होणार आहेत.

रेल्वे विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे अकोला आणि विदर्भातील नागरिकांचे प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार असून, खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!