Join WhatsApp group

मनुताई कन्या शाळेत “जाणीव स्पर्शाची – सुरुवात सुरक्षिततेची” या विषयावर प्रभावी कार्यशाळा संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | 15 जुलै 2025 – मनुताई कन्या शाळेच्या सभागृहात आज “गुड टच, बॅड टच कसा ओळखावा?” या विषयावर विद्यार्थिनींसाठी महत्त्वपूर्ण कार्यशाळा पार पडली.

‘नारी शक्ती – राष्ट्र शक्ती’ हे ध्येय बाळगणाऱ्या अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मिड टाऊन शाखा, अकोला यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात मंगल सरस्वती पूजनाने करण्यात आली.

प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. किरण हिरानंदानी (वेलनेस कोच, पॉझिटिव्ह थेरपिस्ट व सायकोलॉजिस्ट) यांची विशेष उपस्थिती होती. त्यांचा मंचातर्फे शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ऐश्वर्याताई धारस्कर, पर्यवेक्षिका श्रीमती संज्योती मांगे, तसेच मंचाच्या सदस्यांमध्ये सोनाली राठोड, रूपाली कागलीवाल, रुची गुप्ता, प्रभा अग्रवाल, मीनाक्षी अग्रवाल, निधी मित्तल, नेहा अग्रवाल, सुचिता अग्रवाल, प्रीती अग्रवाल, पुनम गोयनका, अर्चना अग्रवाल, कल्याणी पवार, भारती वारके, पलक अग्रवाल यांची उपस्थिती लाभली.

डॉ. हिरानंदानी यांनी विद्यार्थिनींना चांगला वाईट स्पर्श यातील फरक स्पष्ट करत अनेक उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

विद्यार्थिनींच्या आकलनासाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ क्लिप देखील दाखवण्यात आली. उपस्थित विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले. शेवटी सौ. संगीता किरडे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!