Join WhatsApp group

रेल्वे आंदोलनाचा पाचवा दिवस – दिवा ते CSMT लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन तीव्र

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिवा, ५ जुलै २५ :

दिवा ते CSMT लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या सौ. अश्विनी अमोल केंद्रे यांनी १ जुलैपासून दिवा रेल्वे स्थानकाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले असून, आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

मागणीसाठी अनेक आंदोलने, तरीही प्रशासन गप्पच

याआधीही लोकल सुरू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, मोर्चा, उपोषण आणि ढोल बजाव आंदोलन झाले; परंतु रेल्वे प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.फेब्रुवारी किंवा जूनमध्ये लोकल सुरू होईल असे सांगण्यात आले होते, मात्र आजवर ती प्रत्यक्षात आलेली नाही. “घोडं अडलं कुठे?” असा सवाल आंदोलक उपस्थित करत आहेत.

जीव धोक्यात – अपघातांमुळे संताप

९ जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ फास्ट ट्रॅकवर झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला. रोज अपघात होतात, जीव जातात, तरीही रेल्वे प्रशासन लोकल सेवा सुरू करण्याबाबत मौन का पाळते? असा सवाल केंद्रे यांनी उपस्थित केला आहे.

संघर्ष सुरूच राहणार

जोपर्यंत दिवा ते CSMT लोकल सेवा सुरू होत नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सौ. केंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!