Join WhatsApp group

बोरगाव पोलिसांनी ६ गायींना दिले जीवदान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला: २ जुलै २५: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गायींची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ६ गायींचा जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 04 NH 4195 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून गायींची कत्तलीसाठी तस्करी होत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे बोरगाव पोलिसांनी रात्रीच्या सुमारास सापळा रचून वाहन थांबवले.

झडती घेतली असता, गाडीतील सीट्स काढून त्यामध्ये ६ गायी कोंबून ठेवलेल्या आढळून आल्या.पोलिसांनी तत्काळ वाहन जप्त करून संबंधित तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच या गायींना आदर्श गौसेवा प्रकल्पात सुपूर्द करण्यात आले असून, त्यांच्या देखभालीची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

गायींच्या तस्करीच्या घटना जिल्ह्यात सातत्याने वाढत असून, रात्री २ ते पहाटे ५ या वेळेत तस्कर वाहनांद्वारे जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे उघड झाले आहे.

अमरावतीहून अकोल्याला येणारा मूर्तिजापूर रस्ता व आपटापा रस्त्याचा विशेष वापर होतो.

बोरगाव पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि दक्षतेमुळे ६ निरपराध गायींचा जीव वाचला असून, नागरिकांनीही अशा अनैतिक कृत्यांविषयी पोलिसांना वेळेवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!