Join WhatsApp group

अकोला सिव्हिल लाईन परिसरात चोरांचा धुमाकूळ; तिन घरांमध्ये चोरी, मुद्देमाला सह कांदे सुद्धा चोरले

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १ जुलै २५: अकोला :सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे. मोठी उमरी परिसरातील पेट्रोल पंपामागील लेआउट आणि कोठारी लेआउट या भागात चोरट्यांनी तीन घरांना लक्ष्य करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला.

विशेष म्हणजे चोरट्यांनी दागदागिने, रोख रक्कम, गॅस सिलेंडर आणि कांद्याची पोतीसुद्धा चोरी केली आहेत.घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांसाठी हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक ठरत आहे.प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एका घरातून सोन्याचे मंगळसूत्र, गॅस सिलेंडर, शेव्हिंग मशीन आणि कांद्याची पोती चोरली. दुसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न झाला असला तरी तो फसला.

मात्र कोठारी लेआउटमधील तिसऱ्या घरातून कपाटातील वस्तूंची चोरी करण्यात आली असून घरातील सीसीटीव्ही कॅमेरेही उचकटून नेण्यात आले आहेत.या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. दरम्यान, चोरीसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पोलीस तपास सुरू आहे.

स्थानिक पोलीस लवकरच या चोरट्यांना अटक करतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!