Join WhatsApp group

पंढरपूर वारीसाठी भाजपाच्यावतीने वारकऱ्यांचा सन्मान, सेवाभावी परंपरेला बळ

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – १ जुलै २५ :
साडेपाचशे वर्षांची अखंड परंपरा लाभलेली पंढरपूरची वारी ही केवळ भक्तीचा उत्सव नाही, तर मानवतेचा संदेश देणारी जगातील सर्वात मोठी यात्रा आहे. जात, पंथ, भाषा, वंश विसरून फक्त विठ्ठलभक्तीत तल्लीन होणारे लाखो वारकरी समाजाला समता आणि सेवा यांचे जिवंत उदाहरण देतात. या भाविकांचा सन्मान आणि आशीर्वाद घेणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या सौ. सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले.

भाजपातर्फे गेल्या १२ वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष कार्यक्रम राबवला जात असून यंदाही एसटी डेपो क्र. १ आणि २ मधून पंढरपूरसाठी निघालेल्या १२० प्रवाश्यांच्या बसचे पूजन, स्वागत व वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत मसने होते. प्रमुख उपस्थितीत किशोर पाटील, सौ. मंजुषाताई सावरकर, चंदाताई शर्मा, अर्चनाताई शर्मा, रमण जैन, माधव मानकर, गिरीश जोशी, दिलीप पटोकार यांचा समावेश होता.

कार्यक्रमात उपस्थित बोलताना सौ. सुहासिनी ताई धोत्रे यांनी भाजपाची ही वारकरी सन्मानाची परंपरा ही सनातन प्रेम, भक्ती परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक असल्याचे नमूद केले. तर मंजुषाताई सावरकर यांनी, “वारकरी संप्रदाय हा श्रद्धा, भक्ती, संस्कृती संवर्धन आणि समाजशीलतेचा आदर्श आहे,” असे सांगत वारकऱ्यांना भेटवस्तू दिल्या.

स्व. आमदार गोवर्धन शर्मा व संजय भाऊ धोत्रे यांच्या वारसाला पुढे नेत रणधीर भाऊ सावरकर (प्रदेश सरचिटणीस, भाजपा) व खासदार अनुप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी १२७ वारकऱ्यांचा सन्मान व आशीर्वाद घेण्यात आला.

उपस्थित मान्यवरांमध्ये विजय इंगळे, अभिजीत बांगर, संजय झाडोकार, अर्थव जैन, डॉ. संजय शर्मा, मोहन पारधी, गंगादेवी शर्मा, पुष्पा खंडेलवाल, सीमाताई मांगते पाटील, सुनिता अग्रवाल, किरण बावस्कर देवर, निशाताई कडी, छायाताई तोडसाम, रंजनाताई विंचनकर, प्रणिता समरीतकर, अर्चनाताई मसने यांचा समावेश होता.

वारीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेता भाजपाचा हा उपक्रम वारकऱ्यांप्रती असलेली कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करणारा ठरला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!