Join WhatsApp group

रमाबाई नगर जुने शहर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी तात्काळ अटकेत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : २१ जून २५ : रमाबाई नगर जुने शहर येथे एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला आहे अशा पहाटेच्या दरम्यान मिळालेल्या माहीतीच्या आधारे घटनास्थळी ठाणेदार पो.स्टे. वे अधिकारी, नाईट ऑफिसर तसेच पो. स्टाप असे पोहचुन घटनास्थळाची पाहणी केली असता सदर ठिकाणी एक व्यक्ती मृत असवस्थेत पडलेला असुन अज्ञात व्यक्तीने त्याचे डोकयावर दगडाने मारल्याचे पोलिसांना दिसले.

वरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरिल सिसिटिव्ही फुटेजवरून, तांत्रीक विश्लेषन तसेच गोपीणीय माहीतीचे आधारे अज्ञात आरोपीची ओळख पटवुन सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे पवन उर्फ टकल्या विलास मोरे रा. रमाबाई नगर जुने शहर अकोला याचा शोध घेवुन पकडण्या करीता तिन वेगवेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले असता पो.स्टे. जुने शहरच्या तिनही आरोपी शोध पथकाव्दारे सदरच्या गुन्हयातील आरोपीचा अथक प्रयत्नानंतर वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेवुन आरोपी नामे पवन उर्फ टकल्या विलास मोरे रा. रमाबाई नगर जुने शहर अकोला याला ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्जीत चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जुने शहर येथील ठाणेदार श्री. नितीन लेव्हरकर, सपोनि विजय जाधव, पोउपनि रविंद्र करणकार, पोलीस अंमलदार संतोष मेंढे, पंकज उपाध्याय, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, स्वप्नील पोधाडे, पवन डांबलकर, सुनिल मुळे, गणेश मानकरी, अजय गसकल, पवन बोस, शरद कांबळे यांनी कामगिरी केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!