Join WhatsApp group

ऑपरेशन प्रहार अंतर्गत मुर्तीजापुर शहर पोलिसांची गोवंश तस्करांवर कारवाई – लाखोंचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ऑपरेशन प्रहार अकोला जिल्ह्यात राबिवले असून अवैध्य धंध्या वर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. ऑपरेशन प्रहारला घेऊन जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशन अलर्ट मोड वर दिसत आहे.

आज दिनांक १८ जून २५ रोजी मुर्तीजापुर पोलिसांना गोवंश तस्करी बाबत माहिती मिळताच दुपारी ३:५५ मी. ने अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कारंजा टी पाॅइंट अमरावतिचा दिशने जाणारी महिंद्र बोलेरो पिकअप (MH 40 N 5804 ) गाडी अडवली.

त्यामध्ये चक्क गोवंश जातीचा चरबीचे २४ पिपे(३० किलो प्रत्येकी वजन) गोवंश जातीचे कातडे (१४९ किलो) आढळले.

पोलिसांनी एकूण ५,४०,६०० रुपयांचे एकूण माल जप्त करून मो. शेख आरिफ (२० वर्ष ) रा. पांढरी, व मो. हसम शेख कसं (३८ वर्ष) बडनेरा यांना अटक करून ३०६/२५ काळ ३२५,३ (५) भा.न्या. सह कलम ५,५(क) ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई केली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व ठाणेदार अजित जाधव यांचा मार्गदर्शनात PSI आशिष शिंदे, H.C. रवी जाधव, H.C. सचिन दांदळे , P.C. गजानन खेडकर, P.C. लक्ष्मण लोखंडे यांनी केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!