Join WhatsApp group

Ads

-

मदरशांच्या पुस्तकांसाठी बनावट बिले देऊन सरकारशी फसवणूक

By Sarkarmzanews

June 14, 2025 4:51 pm

Ads

दिनांक १४ जून २५ : अकोला : अरबी मदरशात वापरल्या जाणाऱ्या पुस्तकांची खरेदी अकोल्यातील फुलारी चौकातील महेमुदिया बुक डेपोमधून करण्यात आली होती. पोलिस तपासात दुकानचालकाने असे म्हटले होते की या शाळेला अशी कोणतीही पुस्तके विकली गेली नाहीत आणि सादर केलेले बिल त्याच्या दुकानाचे नव्हते. ज्यावरून तपास समितीला असे आढळून आले की शाळा व्यवस्थापनाने बनावट बिले सादर करून आणि सरकारी निधीचा गैरवापर करून सरकारची फसवणूक केली.

बार्शीटकली शाळेची चौकशी करणाऱ्या समितीने तपासानंतर दिलेल्या तपशीलात म्हटले आहे की, गरीब नवाज अरेबिक मदरसा, आयेशा सिद्दिका अरेबिक मदरसा, आकेशा सिद्दिका अरेबिक मदरसा हे गरीब नवाज एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी चालवत होती. हे मदरसे फक्त कागदपत्रांवर चालवले जात होते. मदरशांचे कामकाज कागदावर दाखवून सरकारी योजनांचा फायदा घेऊन मदरसा चालकांनी सरकारची फसवणूक केली. या संदर्भात बार्शीटकली पोलिसांनी अकोल्यातील फुलारी चौकातील महेमुदिया बुक डेपोचे संचालक मौलाना सय्यद वसीयुल्लाह यांना बोलावून त्यांचे बयान नोंदवले. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने म्हटले आहे की, माझ्या दुकानातून अशी कोणतीही पुस्तके पुरवण्यात आली नव्हती आणि अशी पुस्तके त्याच्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. सदर बिल त्याच्या दुकानाचे नाही. यावरून हे स्पष्ट होते की, मदरसा चालकांनी बनावट बिले सादर करून आणि कागदपत्रांवर मदरशाचे कामकाज दाखवून सरकारची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली आहे.

Related Article

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!