०५ जून २५ : अकोला : सनातन धर्मामध्ये भक्ताला महत्त्व असून संत गजानन महाराज चे वारकरी पूजनी असून सोबत वारकऱ्यांचे सेवेकरी हेही महत्त्वाचे असून त्यांचा सन्मान करणे गौरव करणे त्यांच्या कार्याची दखल घेणे समाजाला दिशा देण्याचा धर्मामध्ये केवळ प्रत्येकाचा विचार करून कार्य करणारा एकमेव सनातन धर्म असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप, धोत्रे यांनी केले.
अकोला शहरातील पवित्र संत महात्म्यांच्या व संत गजानन महाराजांच्या पालखी च्या भक्तांच्या पदचिन्हाने पवित्र मुंगीलाल बाजोरिया मैदानावर संत गजानन महाराजांच्या पालखीचे मुक्काम प्रसंगी सेवा देणारे टेलर्स जलसेवा अन्नदान तसेच वारकरी आणि भक्तांच्या चपली दुरुस्त करण्याचे काम करणारे बांधव कपडे धुणारे बांधव तसेच चप्पल स्टॅन्ड मध्ये सेवा देणारे समाजातील विविध घटकातील सनातन प्रेमींचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून स्वागत करण्याची परंपरा सुरू आहे.
या परंपरा अनुसार भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकारात हा अभिनव कार्यक्रम करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते फक्त आणि ईश्वर यामधील महत्त्वाचा दुवा सेवेकरी असून सेवेला महत्त्व असून सनातन धर्माला सेवा करणाऱ्या अनेक सिख बांधव हे कार सेवा करतात आपल्या पदाचा विचार न करता भक्तांची सेवा करणे ही परंपरा सातत्याने सुरू असून अनेक तीर्थस्थळावर अनेक भक्त साफसफाई चे काम करतात याच धरतीवर काम करणाऱ्या सर्व भक्तांचे नमन करणे त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे कर्तव्य असून या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन संत आपल्या दारी आल्या या भावनेने संत रविदासांनी दाखवलेल्या मार्गानुसार आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराजांना अभिप्रेत कार्य करणाऱ्या भक्तांना नमन केले अशा 50 कार्यकर्त्यांना तिथे जाऊन भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल, जयंत मसने सुमनताई गावंडे चंदाताई शर्मा गिरीश जोशी माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड पवन महल्ले, जानवी डोंगरे, नितेश पाली बन्सी चव्हाण, प्रकाश अग्रवाल संतोष पांडे, कृष्णा शर्मा मनोज शाहू, गिरीराज तिवारी ऋषी चोपडे ऋषी जगताप, अजय पांडे,संजय गोटफोडे: हर्षल वानखडे, कपिल बुंदेले, संजय गोटफोडे: गोपाल मुळे राजेश वगारे रवींद्र भंसाली, अनिता चौधरी प्रकाश धोगलीया, प्रशांत अवचार, केशव हेडा, आधी प्रामुख्याने उपस्थित होते.