Join WhatsApp group

भक्तांचे विश्वास सार्थ करण्यासाठी संस्था चार पीढीच्या गौरव करणे आपले कर्तव्य – आ. रणधीर सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 28 : अकोला : अकोला ,अमरावती बुलढाणा, जिल्ह्यातील भाविक भक्तांच्या व श्रद्धा आणि विश्वास अध्यात्माला शांती देणार रूपनाथ महाराज संस्थान भक्तांना मनोकामनापूर्ती सोबत प्रसन्नता निर्माण करणारा असून आपण या तीर्थस्थळासाठी निधी उपलब्ध करून देऊन या भागाचा विकास करून ग्रामीण देवतांचा प्रचार प्रसार होण्याची गरज असून या भागात सतत धार्मिक कार्यक्रमा सोबत सामाजिक उपयोगी कार्यक्रम या संस्थेच्या वतीने होत असतात.

या संस्थेचा महत्त्व व भक्तांचे विश्वास सार्थ करण्यासाठी कार्यरत गेल्या चार पिढीच्या कार्यकर्त्यांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे अशा शब्दात रूपनाथ महाराज संस्थानचे कार्याची त्यांनी प्रसंचा करून या भागात येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे स्वागत अकोला पूर्व विधानसभेच्या वतीने करून महाप्रसादामध्ये कार सेवा करून आमदार रणधीर सावरकर हे वारकरी आणि सेवेकरीच्या रूपामध्ये कार्यरत झाले.

जिल्ह्यातील *दहीहंडा येथे रूपनाथ महाराज यात्रेनिमित्त भेट देऊन दर्शनही घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला . आमदार रणधीर सावरकर यांनी या संस्थानाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे व या भक्तांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. रूपनाथ महाराज संस्थान भगवान शंकराच्या रूपामध्ये पूर्ण मातेच्या तीरावर विराजमान असून अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या चार जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊन तसेच मध्य प्रदेशातून सुद्धा अनेक भाविक भक्त या यात्रेमध्ये सहभागी होतात त्यांचं स्वागत आमदार सावरकर यांनी केले.

यावेळी सोबत गणेश भाऊ पोटे गोविंद गोयंका दिलीप मिश्रा, विवेक भरणे माधव मानकर, संतोष शिवरकर, विजुभाऊ मगर उपसरपंच सरपंच संजय आठवले संतोष मोहरकर सुभाष भांडे निलेश जैन, माधव बकाल गजानन नळे, सुशील सहगल मनोज अग्रवाल राजू कयमखेडे आशिष मगर अशपाक भाई गजानन गोतमारे राजू लाड सुनील पोटे आशिष भोंडे अनुप अग्रवाल यांनी सुद्धा कार सेवा करून सक्रिय सहभाग घेतला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!