Join WhatsApp group

दिवंगत तुकारामजी बिडकर – सार्वजनिक श्रध्दांजली सभा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २२ : मुर्तिजापूर(नरेंद्र खवले) : मुर्तिजापूर मतदार संघाचे माजी आमदार विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, निसर्गवासी प्राध्यापक तुकारामभाऊ बिडकर व प्रा. राजदत्त मानकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्व धर्मीय, सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन केलेले आहे.

सदर शोक सभा ही सोमवार दिनांक २४/२/२०२५ रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता *भक्तीधाम मंदिर सभागृह समता नगर* भारतीय ज्ञानपिठ च्या बाजूला, मूर्तिजापूर येथे राहील. या शोक सभेचे आयोजन क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती व अ.भा.महात्मा फुले समता परिषद मुर्तिजापूर यांच्या द्वारा करण्यात येणार आहे.

या सभेकरिता सर्व धर्मीय तसेच सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख, कार्यकर्ते तथा निसर्गवासी प्रा.तुकारामभाऊ बिडकर यांचे स्नेहिमित्र परिवार यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती व अ.भा.महात्मा फुले समता परिषद मुर्तिजापूर यांचे द्वारा करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!