Join WhatsApp group

कुंभ हा अध्यात्म मानवता सामाजिक समरसता _ खासदार धोत्रे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक : 20 :अकोला : कुंभ हा अध्यात्म मानवता सामाजिक समरसता सोबत लहान मोठे याच्यातील मतभेद दूर करणारा सांस्कृतिक व सनातन धर्माचा प्रतीक असल्यामुळे एक उत्तम व्यवस्था कोणतीही गडबड न करता कोणाही धर्मावर टीका टिपणी न करता कोणत्याही धर्माला आपल्याकडे आमंत्रित करण्याचा प्रयत्न न करता कोणतीही गडबड न करता सातत्याने देशातील 64 कोटी जनतेने गंगा, यमुना सरस्वती संगम तीर्थावर ,स्नान करून देशाच्या एकतेचा मंत्र दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला आयोजन असल्याची प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.

आपले पूर्वज तसेच अकोल्यातील तमाम लोकसभा मतदारसंघातील कल्याणाची कामना प्रयागराज तीर्थावर तसेच हनुमंत रायाला करून नाग वासुकी, संत महात्म्यांचे आशीर्वाद खासदार अनुप धोत्रे यांनी घेतले.

प्रयागराज याचे उत्तम व्यवस्था उत्तम नियोजन प्रशासनाची योग्य मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली समाजाला दिशादर्शक हा कुंभमेळा देशातील प्रत्येक जातपात धर्माच्या पलीकडे एकत्रीकरण करण्याचा व सामाजिक समरसतेचा मंत्र देणारा भेदभाव मिटवणारा व सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांना कृतीने चोख उत्तर असून सहपरिवारासह अकोले करांच्यावतीने सेवा करणाऱ्या कार सेवकांचा त्यांनी सत्कार केला.

त्यांच्याशी संवाद साधला अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे सेवा प्रदान करत आहे त्यांचा कौतुक खासदार धोत्रे यांनी केले तसेच सह पत्नीक समीक्षा धोत्रे तसेच आपल्या कन्या पुत्र यांच्यासोबत महा कुंभात, त्यांनी सक्रिय भाग घेतला.अकोला जिल्ह्यातील जवळपास तीन लाख पेक्षा जास्त नागरिक या कुंभमेळ्यात सहभागी झाले आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!