Join WhatsApp group

वर-वधू परिचय मेळाव्यासाठी विविध समित्या गठीत – उमरी येथे ९ फेब्रुवारी रोजी आदर्श विवाह व परिचय मेळावा चे आयोजन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०३ : अकोला : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाटील समाज वर-वधू सूचक बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने उपवर-वधू परिचय मेळावा व आदर्श विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून तयारी सुरू आहे. मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व समाज बांधवांच्या प्रयत्नाने यावर्षीचा मेळावा देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे.असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने पाटील यांनी केले.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. समाज बांधवांच्या व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने या मेळाव्याची माहिती जिल्हाभरातील समाज बांधवांपर्यंत बैठकीच्या माध्यमातून पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात उपवर-वधू व पालक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

हा मेळावा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी मोठीउमरी येथील शोभा मंगलम मंगल कार्यालय येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. समित्यांमार्फत मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधवांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

या नियोजन बैठकीत मेळावा जास्तीत जास्त प्रमाणात यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त वधू-वरांनी स्वतःचे बायोडाटा घेऊन उपस्थित राहण्याचे समाजबांधव व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या व मत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक ॲड. संतोष गोळे यांनी केले.

या नियोजन बैठकीला मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव म्हैसने, समाजाचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक ओळंबे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, अरुण खोटरे, अशोक पटोकार, सुधीर गावंडे, प्रा. दादाराव पाथ्रीकर, बाबुराव भडांगे, रितेश खुमकर, मिलींद राऊत, डॉ. तेजराव नराजे, प्रा. दत्तात्रय भाकरे, वसंतराव माळी, उमेश वाकडे, संजय इंगळे, संदीप गावंडे, सौ. स्वातीताई कडाळे, रामेश्वर घोरमोडे, मोहन पाटील, सागर सोळंके, सचिन लोखंडे, सुधीर गावंडे,मंचितराव पोहरे, नरेंद्र घोम, कृष्णराव थिटे, गणेशराव घोरमोडे, दिलीप पाटील, दिगंबर भटकर, गजानन टिपरे, विष्णू साबळे, मोहन शेळके, , विद्याधर ढोरे, दिनकर नकासकर, दिवाकर गावंडे, गजानन डिक्कर, गजानन गावंडे, रुपराव भारसाकडे, ज्ञानदेव खेडकर, ना.मा. मोहोड, अशोक भिलकर, संतोष दुतोंडे, रामकृष्ण इंगळे, सुभाष खेडकर, विपिन अतकरे, गजानन धोटे, राजेश्वर दांदळे, गजानन माळी, हिंमतराव पोहरे, सुनील भाटे, प्रमोद टेकाडे, संतोष आखरे, चंद्रकांत ताठे, चंद्रकांत वानखडे, राजेश दांदळे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!