Join WhatsApp group

Ads

नेहरू युवा केंद्र अकोला च्या नावाने महिलांची फसवणूक

By Sarkarmzanews

January 5, 2025 3:03 pm

Ads

दिनांक ०५: मुर्तीजापुर :तालुक्यातील गोरगरीब कष्टाळू महिलांना फक्त ३५०० रुपयात शिलाई मशीन ब्युटी पार्लरची किट देतो असे सांगून मुर्तीजापुर येथील तक्रारीत नमूद दोन महिलांनी अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापुर मधील महिलांचे सुमारे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना उघड झाली.

नेहरू युवा केंद्र अकोला मतदाता जनजागृती अभियान यामध्ये काम करीत असल्याचे सांगून नेहरू युवा केंद्राचा बॅनर च्या नावाखाली व केंद्र सरकार च्या विविध योजनांचे कामे करतो अशा भूलथापा देऊन योजनेअंतर्गत शिलाई मशीन किट वगैरे मोफत मिळवून देऊ बाजारात सुमारे १५००० पेक्षा अधिक किंमत असलेली शिलाई मशीन अवघ्या ३५०० मिळत असल्याने या योजनेत अनेक महिलांनी पैसे जमा केले.

मात्र सुमारे १२ महिने उलटूनही अद्यापही तक्रारीत नमूद नाझिया परविन तैकूब वय 35 वर्ष व सुंदरा भडके दोन्ही राहणार अकोला या दोन्ही महिलांनी शिलाई मशीन न दिल्याने शिलाई मशीन भेटण्याच्या आशेवर पैसे भरलेले त्या महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार उमा शरद चव्हाण वय ३७ रा.मुर्तीजापुर यांनी येथील शहर पोलिस स्थानकात दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी दिली.तक्रारीत नमूद प्रमाणे प्रत्येक महिलेकडून ३५०० प्रमाणे ५० महिलांकडून एकूण देश रक्कम १,७५,००० घेतले आणि ब्युटी पार्लर च्या नावाने प्रत्येक महिलेकडून २५०० रुपये प्रमाणे २५ महिलांकडून एकूण ६२,००० हजार रुपये घेतले असून असे तक्रारकर्त्यां महिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.

त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा याकरिता शहर पोलीस स्टेशनला कैफीयत सादर केली आहे.असे तक्रारकर्त्या महिलांनी तक्रारीत सांगितले आहे.अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दिवसें-दिवस वाढतच आहे.यावर शहर पोलीस काय कारवाई करतात याकडे व त्या गोरगरीब कष्टाळू महिलांना न्याय मिळवून देणार का ?याकडे मुर्तीजापुर वाशियांचे डोळे लागले आहे.त्याचप्रमाणे नेहरू युवा केंद्र अकोला च्या बॅनरच्या नावाखाली त्या दोन महिलांनी फसवणूक केली तर नेहरू युवा केंद्र अकोला हे काय कारवाई करणार ?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!