अकोला : दिनांक २४ : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेण्याकरिता शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन मूर्तिजापूर तालुक्यातील शेकडो म.न.से.च्या पदाधिकारी आणि कार्यकर्यांनी शिवसेनेचे उपनेते अकोला जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख गोपीकिशनजी बाजोरिया साहेब यांच्या सूचनेनुसार,जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख ललित वानखडे,मूर्तिजापूर तालुकाप्रमुख दीपक दांदळे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश देण्यात आला.
यावेळी गौरव अशोकराव मोरे मूर्तिजापूर शिवसेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले.सोबत सुशांत साठे, मनीष बोबडे, प्रदीप सैन, माऊली दांदळे, श्रेयश बांबळ, संदीप फुके, सचिन ठाकरे, पंकज बोर्डे, संतोष कुकडकार, सोनू जाधव, अविनाश गवांदे, राम नरवाले, गणेश धारपवार, राहुल धोरसरे, आदित्य खोकले, अमोल चेडे, नंदकिशोर मालवे, संतोष रुद्रकार, चेतन सोळंके, वैभव महल्ले, मुन्ना कांबे, रोहन नवघरे, यासारख्या शेकडो म.न.से.च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना प्रवेश देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख दीपक दांदळे यांनी केले.
तसेच शिवसेना संपर्कप्रमुख बाजोरिया साहेब व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि शिवसैनिकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात पक्षवाढीसाठी निष्ठेने कार्य करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.पक्ष प्रवेश मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना प्रसिध्दी प्रमुख संदेश काजळकर यांनी मानले.
