Join WhatsApp group

बार्शीटाकळी मध्ये रवी राठी प्रचारात अग्रेसर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे अशातच मूर्तीजापुर विधानसभा 32 मध्ये रवी राठी यांच्या प्रचारात दिव्यांग बांधव सुद्धा अग्रेसर ठरत आहे मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघात यावेळेस चुरशीची लढत होणार आहे यामध्ये अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत आहेत.

अशातच गेल्या दहा वर्षापासून सर्व सामान्य नेतृत्व म्हणून सर्व जनतेला परिचित असलेले रवी रमेशचंद्र राठी यावेळेस पुन्हा या मतदारसंघातून उभे आहेत यावेळेस प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे ते पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी पहिल्याच दिवशी शेतकरी दिव्यांग यांचे नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी प्रचारासाठी उडी घेत मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे.

रवी राठी यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना बार्शीटाकळी तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघातील दिव्यांग बांधव स्वतःच्या गाड्यांनी मतदारसंघात फिरून मतदारांना यावेळेस आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारचा उमेदवार रुग्णसेवक जनसेवक रवी राठी यांच्यासाठी मतदान मागताना दिसून येत आहे त्यामुळे यावेळेस मतदारसंघात परिवर्तन होणार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात दिसून येत आहे रवी राठी यांनी आतापर्यंत शेतकरी शेतमजूर रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी अनेक आंदोलने केली त्याचबरोबर अन्नदाता म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे रवी राठी यांच्या प्रचारामुळे अनेक राजकीय वर्तुळात सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रवी राठी हे अग्रसेल राहतील अशी चर्चा सध्या मतदारसंघात दिसून येत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!