Join Whatsapp

लोकप्रतिनिधी पाहिजे ठेकादार नको

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – १७ ऑक्टो.२४ – सध्या काळ वेळ बदलत चालला आहे, खर्या ला खोट आणि खोट्याला खर कस बनवायचा हे सोशल मिडियाच्या माध्यमातून एकदम सोप झाल आहे. पहिले मोठ मोठे विद्यापीठ असयाचे ज्ञानअर्जन करण्यासाठी आता त्याची गरज लागत नाही. कारण सगळ्यांची एडमिशन व्हाटसप युनिव्हर्सिटी मध्ये आहे.

जे मोबाईल वर येईल तेच खरे अशी लोकांची धारणा झाली आहे. डिजिटल मिडिया आल्यापासून काही लोंकानी आपली बुद्धी गहाण ठेवल्याचे चित्र दर रोज समाजात दिसत आहे.

सध्या निवडणूकीचा पारा गरम असल्यामुळे #राजकारण जास्तच व्हाटसप युनिव्हर्सिटी वर सुरु आहे. जे मनात येईल तशी बातमी बनवायची किवा तसे संदेश टाईप करून लोकांन पर्यंत पोहचवायला वेळ लागत नाही. ते खरे असो कि खोटे?

सध्या खूप बातम्या व संदेश असे व्हाटसप युनिव्हर्सिटीला पाहायला भेटत आहे कि अमुख अमुख मतदार संघात उच्चशिक्षित, गरीब , समाजसेवक इत्यादी उमेदवार देण्यात यावे.

सरकार माझा न्यूज ने मुर्तीजापुर शहारात निवडणुकीचा आढावा घेतला असल्यास एकच समजले कि जनतेला लोकप्रतिनिधी पाहिजे ठेकादार नको.

सगळी कडे परीस्थिती तीच आहे ज्यांना जनता लोकप्रतिनिधी निवडून देते तेच नंतर काही जवळीक लोकांना सोबत घेऊन ठेकेदारी सुरु करतात हे इथेच थांबत नाही तर ठेकेदारी करताना लालच वाढत जातो व मग कमीशन ने पोट भरत नाही तर ठेकेदारान सोबत पार्टनरशिप करतात. मग अमाप पैसा लोकप्रतिनिधी जवळ जमा होतो.

नंतर ED, CD, नको तर ठेकेदारी करून जे पैसे कमविले आहे त्याचा गैर फायदा घेऊन निवडणुकीत जनतेकडून जे पैसे पाच वर्षात लुटले गेले आहे, त्यातून काही कोटी रुपये खर्च करून पैशाचा जोरावर परत निवडणूक लढायची व पैश्याचा जोरावर जनतेला आमिष देऊन जिकांंयची व परत तोच चक्र वर्षानुवर्षे असाच चालत राहतो.

त्या नंतर आपला मुलगा किंवा मुलगी लोकप्रतिनिधी झाली पाहिजे अशी इच्छा लोकप्रतिनिधीला व्यक्त होते व घराणेशाही ला सुरुवात होते. लोकांना हे समजण्यासाठी कित्येक वर्ष निघून जातात तरी सुद्धा हे समजत नाही.

जनतेसाठी निवडणूक म्हणजे फक्त एक मत, दारूची बाटली, काही पैसे, एवड्या पुरती नको.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!