Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापुरचे अंकुश अग्रवाल यांची तालुका प्रचार प्रमुख पदी नियुक्ति

By Sarkarmzanews

September 29, 2024 7:22 pm

Ads

प्रतिनिधी मूर्तिजापूर – मूर्तिजापूरचे युवा समाजसेवक तथा युवा पत्रकार अंकुश कमलकिशोर अग्रवाल यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मूर्तिजापूर तालुका प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षे ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मूर्तिजापूरचे युवा समाजसेवक व युवा पत्रकार अंकुश कमलकिशोर अग्रवाल यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाच्या मूर्तिजापूर तालुका प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. 28 सप्टेंबर 2024 पासून पुढील 3 वर्ष अथावा पुढील आदेश येई पर्यंत ते हे सांभाळतील. या नियुक्तीबद्दल अंकुश अग्रवाल यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष शेखर उर्फ चंद्रभान कोलते यांनी जो विश्वास आपल्यावर टाकला त्याला कदापी तड़ा जाऊ दिला जाणार नाही. सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण नेहमी करत राहू व तालुका प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी इमानदारी ने पार पाडू, अशी ग्वाही अंकुश अग्रवाल यांनी दिली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!