Join WhatsApp group

Ads

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीक विम्याची अंतिम मुदत वाढली; १० ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

By Sarkar Maza

August 7, 2026 2:44 pm

Ads

खरीप पीक विमा योजनेची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवलीमूर्तिजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा : आत्मा समिती अध्यक्ष शामलभूषण कोकाटे यांचे आवाहन

मूर्तिजापूर : खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड तसेच विविध कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक विमा भरण्याची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्यामुळे विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपल्या खरीप पिकांचा विमा काढण्याचे आवाहन आ हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर मतदारसंघातील तसेच तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षा शामलभूषण कोकाटे यांनी केले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. हवामानातील बदल, अतिवृष्टी, पावसाचा खंड, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट आदी कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरू शकतो. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता निर्धारित मुदतीत पीक विमा भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढण्यासाठी संबंधित बँक, अधिकृत विमा प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा संबंधित ऑनलाइन सुविधा केंद्राशी संपर्क साधावा, तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. विमा भरताना शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची व क्षेत्राची माहिती अचूक असल्याची खात्री करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि खरीप पिकांना विमा संरक्षण मिळवून घ्यावे. १० ऑगस्ट ही अंतिम मुदत लक्षात घेऊन शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर पीक विमा भरावा, असे आवाहन आत्मा समितीच्या अध्यक्षा शामलभूषण कोकाटे यांनी केले आहे.

Related Article

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!