Join WhatsApp group

Ads

धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो– मुर्तीजापुरात गुंजला तरुणाईचा आवाज. विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दणाणले शहर

By Sarkar Maza

July 21, 2026 4:25 pm

Ads

मुर्तिजापुर : दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि सतत पेपर फुटीचे गंभीर प्रकार होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार असलेले देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून आमरण उपोषण करत असलेल्या सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशाचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा या मागणी संदर्भात येथील विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सदर मोर्चा मुख्य मार्गाने वीर भगतसिंग चौक आणि पुढे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहोचला होता.

मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो आणि पेपर फुटी बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन शहर दणाणून सोडले होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची भावना दिसून येत होती. मोर्चा शांततेत येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया पोहचला होता.

उपविभागीय अधिकारी यांनी सांगितल्यानुसार दहा ते पंधरा प्रतिनिधी निवेदन घेऊन त्यांना देण्याकरिता गेले होते. यावेळी त्यांनी मोर्चाची परवानगी आहे का ? तुम्ही परवानगी घेतली होती का ? परवानगी दाखवा अशी विचारणा केली.त्यामुळे काही काळ विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन ते धास्तावलेले होते.

त्यानंतर बाहेर उपविभागीय अधिकारी यांच्या वागणुकीबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी प्रेमाची व आपुलकीची वागणूक अपेक्षित होती असे मोर्चातील विद्यार्थ्यांनी सांगितले.

——शांततेत पार पडला मोर्चा—-

रीतसर परवानगी घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांद्वारा काढण्यात आलेल्या मोर्चाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. विविध घोषणा देत आणि हातात फलक व तिरंगा फडकवत निघालेला हा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला. लोकशाही, संविधान, अहिंसा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत काढण्यात आलेल्या या आंदोलनाची आणि शिस्तबद्ध विद्यार्थ्यांच्या मोर्चाची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!