Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूरच्या FIR मधील ‘RP’ कोण? शहरात एकच खळबळ; अज्ञात पांढरपोषाचा शोध लागणार कधी?

By Sarkar Maza

July 15, 2026 7:24 pm

Ads

मुर्तिजापूर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या नेतृत्वाखाली अवैध व्यवसायांवर सातत्याने कारवाई होत असून, समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या काही व्यक्तींवरही पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याने “चुकीला माफी नाही” हा स्पष्ट संदेश दिला आहे.

मात्र, या कारवाईंच्या पार्श्वभूमीवर आता शहरात एका वेगळ्याच मुद्द्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. बालाजी नगर आणि वडरपुरा येथील दोन आरोपींविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरमध्ये ‘RP’ म्हणून एका अज्ञात व्यक्तीचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात मोबाईल क्रमांकाचाही उल्लेख असल्याचे समजते.

यामुळे शहरात आता एकच प्रश्न विचारला जात आहे—हा ‘RP’ नेमका कोण?

तो केवळ तपासातील एक धागा आहे की या प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती?

त्याचा शोध पोलिसांनी लावला आहे का?

शोध लागला असेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली आहे का?

याबाबत अधिकृत माहितीची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.

ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी यापूर्वी अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यामुळे एफआयआरमध्ये नमूद केलेल्या ‘RP’ची ओळख आणि त्याची भूमिका तपासातून स्पष्ट होणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. तपास सुरू असल्याने सर्व बाबी उघड करणे शक्य नसू शकते. तपास पूर्ण झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीची भूमिका आणि पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होईल.

Related Article

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

अकोला एमआयडीसीतबनावट गुटखा कंपनी वर कारवाई पंचनामा सुरू, आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरच

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी*शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन*

“मुर्तिजापूर शहर पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी; चोरीतील ₹72,300 चा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत”

कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अकोल्याचा मुद्दा गाजला; आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली

मुर्तिजापूरच्या FIR मधील ‘RP’ कोण? शहरात एकच खळबळ; अज्ञात पांढरपोषाचा शोध लागणार कधी?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!