Join WhatsApp group

Ads

ऑपरेशन प्रहारचा धडाका; २४ तासांत चार मोठ्या कारवाया, तलवारबाज, जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी, गुटखा साठेबाज आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांचा घाव

By Sarkar Maza

July 7, 2026 10:33 am

Ads

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अकोला पोलिसांनी गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटकांविरोधात धडक मोहीम सुरू ठेवली आहे. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चार मोठ्या कारवाया करत तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक, जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी, शासनबंदी असलेला गुटखा साठवून विक्री करणारा व्यापारी आणि जुगार अड्ड्यावर कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केला.

देशमुख फाईलमध्ये तलवारबाज जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेने देशमुख फाईल परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या गणेश अंकुश गायकवाड (वय २१) याला अटक केली. त्याच्याकडून ₹१,५०० किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून रामदासपेठ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी २४ तासांत अटकेत

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून सादिक खान याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या चंदन ऊर्फ चंदू राजकुमार माखीजा (वय ३६) याला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. न्यायालयाने आरोपीला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा जप्त

खदान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रेमप्रकाश आश्रमजवळील सिंधी कॅम्प परिसरात छापा टाकण्यात आला. आरोपी गुलशन मनोहरलाल दुलानी (वय ४०) याच्या घरातून ₹२,३३,४९० किमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त करण्यात आला.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; ₹७.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येदलापूर शेतशिवारात सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ₹२२,३०० रोख, ८ मोटारसायकली, ६ मोबाईल असा एकूण ₹७.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वाढता धाक

या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व खदान पोलीस ठाण्याच्या पथकांनी यशस्वीपणे पार पाडल्या.

ऑपरेशन प्रहार अंतर्गत सातत्याने सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे अवैध शस्त्रे, जुगार, बंदी असलेल्या गुटख्याचा काळाबाजार आणि गंभीर गुन्हे करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक वाढत असून, अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

Related Article

बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – विधिमंडळात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांची जोरदार मागणी

ऑपरेशन प्रहारचा धडाका; २४ तासांत चार मोठ्या कारवाया, तलवारबाज, जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी, गुटखा साठेबाज आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांचा घाव

स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजींना संगीतमय आदरांजली

अकोला MIDC मधील मसाला उद्योगांवर धाड टाकणार का?लाल मिरची, धणे व हळद पावडरमध्ये भेसळीच्या चर्चांनी ग्राहकांमध्ये चिंता.

मोरगाव भाकरे येथील RO प्लांटचे कुलूप तोडल्याचा आरोप; दलित ठेकेदाराने न्यायाची मागणी

शेतातील पराटीचे पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केल्याचा आरोप; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांत एनसीआर दाखल

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!