Join WhatsApp group

Ads

-

शाळांमध्ये एका बुक स्टोअरची सक्ती थांबवा; प्रत्येक शाळेत किमान पाच बुक स्टोअर्सची यादी लावण्याची मागणी

By Sarkar Maza

July 3, 2026 9:28 am

Ads

मूर्तीजापूर शहरातील इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी एका विशिष्ट बुक स्टोअरची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप साईराज मित्र मंडळाने केला आहे. या प्रकारामुळे पालकांची आर्थिक लूट होत असून विद्यार्थी व पालकांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा दावा मंडळाने केला आहे.

यासंदर्भात साईराज मित्र मंडळाच्या वतीने पंचायत समिती, मूर्तीजापूर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शासनाच्या संबंधित जीआरची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक शाळेने किमान पाच अधिकृत बुक स्टोअर्सची नावे शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पसंतीच्या दुकानातून पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध होईल, असे मंडळाचे म्हणणे आहे.

निवेदनात काही शाळांनी एका विशिष्ट बुक स्टोअरशी संगनमत अथवा करार करून विद्यार्थ्यांना तेथूनच पुस्तके व साहित्य खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे इतर बुक स्टोअर्सवर अन्याय होत असून स्पर्धात्मक दरांचा लाभ पालकांना मिळत नाही.

परिणामी अनेक पालकांना जादा दर मोजावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व शाळांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व संबंधित बुक स्टोअर्सची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साईराज मित्र मंडळाने केली आहे.

अन्यथा संबंधित शाळा व बुक स्टोअर्सविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे.

निवेदन देताना साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष रवी चौहान, उपाध्यक्ष दिनेश श्रीवास, सुनील भोजगडिया, विलास वानखेडे, विलास नसले, विष्णू लोडम, शाम काकडे, संतोष इंगोले, मोहम्मद इम्रान, रमेश दर्याणी, दिगंबर सदार, मनोज आहेरवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Article

पॉर्नचा विळखा… तरुणाईसमोरील नवे आणि गंभीर आव्हान!

पोलिसांचा धाडसी पाठलाग अन् आरोपी गजाआड; अकोला पोलिसांची वेगवान कारवाई

दोनद येथील दुर्घटनेनंतर शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाबाबत विविध दावे, पालकांकडून विविध आरोप; सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी

अवैध सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करा; राज्यव्यापी हेल्पलाईनची आमदार हरीश पिंपळेंची विधानसभेत मागणी

अकोल्यात खळबळ! भररस्त्यात याकूब पहलवान यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला; उपचार दरम्यान मृत्यू

निसर्गाच्या तडाख्याने दहिकर कुटुंब उघड्यावर; अश्रूंनाही बांध फुटला, मदतीसाठी समाजासह शासनानेही पुढे येण्याची गरज

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!