Join WhatsApp group

Ads

-

दोनद येथील दुर्घटनेनंतर शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाबाबत विविध दावे, पालकांकडून विविध आरोप; सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी

By Sarkar Maza

June 30, 2026 8:09 pm

Ads

मुर्तिजापूर तालुक्यातील दोनद नदीपात्रात २७ जून रोजी ज्ञानेश्वर दादाराव सोळंके यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर आता या प्रकरणाबाबत विविध आरोप व चर्चांना उधाण आले असून, संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, घटनेच्या दिवशी दोनद येथे एका शैक्षणिक संस्थेच्या वतीने रोडग्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना निमंत्रित करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांना आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेच्या शाळेच्या बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

याशिवाय, काही पालकांना त्यांच्या पाल्यांचा प्रवेश संबंधित शैक्षणिक संस्थेत घेण्याच्या बदल्यात आर्थिक आमिष दाखविल्याचे आरोपही स्थानिक स्तरावर चर्चेत आहेत. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित संस्थेची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित काही माहिती व कागदपत्रे **’सरकार माझा न्यूज’**कडे प्राप्त झाली असून त्यांची स्वतंत्र पडताळणी सुरू आहे. उपलब्ध माहितीची सत्यता तपासून, सर्व संबंधित पक्षांची भूमिका जाणून घेतल्यानंतरच पुढील सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.

या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप चर्चेत असून, संबंधित शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांची कथित ‘डमी अॅडमिशन’ करून प्रवेशसंख्या वाढविण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा काही पालकांकडून केला जात आहे.

या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची सखोल चौकशी शिक्षण विभागाने करावी, तसेच आवश्यक असल्यास प्रवेश नोंदी, उपस्थिती रजिस्टर आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

ज्ञानेश्वर सोळंके यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, कार्यक्रमाचे आयोजन, सुरक्षेची व्यवस्था, तसेच संबंधितांची जबाबदारी याबाबत सक्षम यंत्रणांनी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.

Related Article

दोनद येथील दुर्घटनेनंतर शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाबाबत विविध दावे, पालकांकडून विविध आरोप; सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी

अवैध सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करा; राज्यव्यापी हेल्पलाईनची आमदार हरीश पिंपळेंची विधानसभेत मागणी

अकोल्यात खळबळ! भररस्त्यात याकूब पहलवान यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला; उपचार दरम्यान मृत्यू

निसर्गाच्या तडाख्याने दहिकर कुटुंब उघड्यावर; अश्रूंनाही बांध फुटला, मदतीसाठी समाजासह शासनानेही पुढे येण्याची गरज

अकोल्यातील गुलाब नगर परिसरात अवैध पेट्रोल साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

दोनद येथे अंघोळीसाठी गेलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून अंत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!