Join WhatsApp group

Ads

अकोला ब्रेकिंग न्युज “एका रात्रीसाठी तुझी मुलगी माझा जवळ पाठव” ऑफरचा आरोप; एएसआय जाधव निलंबित

By Sarkar Maza

April 1, 2026 12:20 pm

Ads

अकोला : कायद्याचे रक्षण करणाऱ्या वर्दीवरच संशयाची सावली पडावी, असा संतापजनक प्रकार अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात उघडकीस आल्याचा आरोप आहे. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपी महिलेकडे तिच्या २७ वर्षीय मुलीला पैशांच्या मोबदल्यात “एका रात्रीसाठी” पाठवण्याची कथित मागणी ड्युटीवरील अधिकाऱ्याने केल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे.

या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होताच शहरात संतापाची लाट उसळली आहे.सायबर गुन्ह्यात अटक झालेली महिला लॉकअपमध्ये असताना संबंधित अधिकाऱ्याने तिच्या मुलीचे वय विचारले. “२७ वर्षे आहे,” असे उत्तर मिळताच “दहा हजार देतो, एका रात्रीसाठी पाठव,” असा कथित प्रस्ताव मांडल्याचा महिलेचा आरोप आहे.

“गुन्हा मी केला, माझ्या मुलीने नाही,” असे म्हणत तिने पोलिसांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.व्हायरल व्हिडिओत मात्र संबंधित अधिकारी आरोप फेटाळताना दिसतो. “मी असे काही बोललो का? फालतू आरोप करू नको,” असे तो म्हणताना ऐकू येते. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानेही “माझ्यासमोर तसे काही झाले नाही,” असे सांगितल्याचे व्हिडिओत दिसते.तरीही

तरीहि, दुसऱ्या क्लिप मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “वर्दी घालून असे कृत्य करताना लाज वाटली नाही का?” असा जाब विचारल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित होते.

या प्रकरणात राजेश जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांनी दिली आहे.

जाधव यांचा पूर्वीच्या सेवा नोंदी बाबतही वादग्रस्त बाबी असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.

त्यामुळे या घटनेमागील सत्य आणि जबाबदारी अधिक स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.लॉकअपसारख्या सुरक्षित ठिकाणी महिलेकडे अशा प्रकारची कथित मागणी होणे ही केवळ एका अधिकाऱ्याची चूक नसून संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी बाब आहे.

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पोलिस दलाची प्रतिमा या घटनेमुळे मलिन झाली आहे.

विशेष म्हणजे, अकोला पोलिस दलाने नुकत्याच राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवला होता. पण अशा घटनांनी त्या यशावर पाणी फेरले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!