Join WhatsApp group

Ads

अभिनव सुशिल मोहोड याने अमरावती विभागाला मिळवून दिले कांस्य पदक

By Sarkarmzanews

February 5, 2026 7:02 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक ०५ — क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे (महाराष्ट्र राज्य) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने दि. ३ ते ४ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अभिनव सुशिल मोहोड याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले.

माजी सैनिक अभिमान व्यायाम शाळा, कुरणखेड व श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूल, मूर्तिजापूर येथील विद्यार्थी असलेल्या अभिनवने ५३ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती विभागासह अकोला जिल्हा आणि आपल्या शाळेचा मान उंचावला.

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती व मराठवाडा असे एकूण आठ विभाग सहभागी झाले होते.अभिनव मोहोड याने अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरावर कांस्य पदक मिळविल्याने अमरावती विभाग, अकोला जिल्हा, शाळा तसेच त्याच्या मूळ गावात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या यशाचे श्रेय त्याने संस्थेचे अध्यक्ष अवधूत ढोरे, शाळेच्या प्राचार्या सारिका कडू, क्रीडा शिक्षक निलेश उंबरकर तसेच आई-वडिलांना दिले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!