Join WhatsApp group

Ads

-

कै. मारोतीआप्पा पिंपळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मूर्तिजापूरमध्ये मोफत खुले वाचनालय

By Sarkarmzanews

February 2, 2026 1:26 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक ०२ :

कै. मारोतीआप्पा विठ्ठलआप्पा पिंपळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक, मूर्तिजापूर येथे मोफत खुले वाचनालय नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले. आमदार हरीश मारुतीआप्पा पिंपळे यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला आवाचनालयाचे उद्घाटन दुर्गाताई मारुतीआप्पा पिंपळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपनगराध्यक्ष रोहित पवार, रूपालीताई तिडके तसेच भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

oplus_8389632

या वाचनालयामध्ये नागरिकांसाठी फक्त दैनिक व साप्ताहिक वर्तमानपत्रे वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरात प्रथमच अशा स्वरूपाचे खुले वर्तमानपत्र वाचनालय सुरू करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, सकाळी फेरफटका मारणारे नागरिक तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

नागरिकांना दैनंदिन घडामोडी, सामाजिक-राजकीय-शैक्षणिक बातम्यांची माहिती सहज मिळावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी वाचनाची सवय वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी कै. मारोतीआप्पा पिंपळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेली ही सुविधा समाजोपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!