Join WhatsApp group

Ads

-

बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीत अवमानाचा प्रकार प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणात त्रुटी, पत्रकारांची वरिष्ठांकडे तक्रार

By Sarkarmzanews

January 26, 2026 3:16 pm

Ads

बार्शीटाकळी (प्रतिनिधी):प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी बार्शीटाकळी तहसील कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज प्रोटोकॉलचे पालन न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ध्वज वंदन न करता ध्वजारोहण करण्यात आले, तसेच राष्ट्रगीत अर्धवट वाजवण्यात आल्याने राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

या संदर्भात तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना विचारणा केली असता, त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पत्रकार व नागरिकांसमोर आक्षेपार्ह हातवारे व शब्दप्रयोग केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सदर घटनेबाबत मा. पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

पालकमंत्री महोदयांनी या प्रकरणाची दखल घेत घटनेत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले.

प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!