Join WhatsApp group

Ads

--

जादा सावरीचा धंदा वाहतुकीचे नियम धाब्यावर–अपघाताची वाट पाहणारे प्रशासन?

By Sarkarmzanews

January 13, 2026 12:25 pm

Ads

मूर्तिजापूर: दिनांक १३ : दररोज सकाळी हेंडज येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बायपास मार्गावरून धावणाऱ्या ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबले जात असून अनेक विद्यार्थी थेट ऑटोला लटकून प्रवास करत असल्याचे धक्कादायक चित्र रोज पाहायला मिळत आहे.

वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रवासामुळे एखादी छोटी चूकसुद्धा मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकते. मात्र, हे सर्व उघडपणे घडत असतानाही वाहतूक विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित कॉलेज प्रशासन यांच्याकडून आश्चर्यकारक शांतता पाळली जात आहे.

प्रश्न असा उपस्थित होतो की, उद्या एखादी दुर्घटना घडलीच तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? निष्पाप विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन वाट पाहत आहे की अपघात झाल्यावरच हालचाल करणार?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा धोकादायक खेळ तात्काळ थांबवून ऑटोचालकांवर कठोर कारवाई करणे, नियमित तपासणी करणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा ‘अपघातानंतर जागे झालेले प्रशासन’ असा शिक्का बसायला वेळ लागणार नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!